सन २०२४-२०२५ अंतर्गत बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत स्पर्धांमध्ये जि. प. प्राथमिक शाळा, जामसंडे खाकशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश

 देवगड,दि.२० डिसेंबर
सन २०२४-२०२५ अंतर्गत देवगड तालुक्यामध्ये पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत स्पर्धांमध्ये जि. प. प्राथमिक शाळा, जामसंडे खाकशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
या महोत्सवांतर्गत आयोजित ज्ञानी मी होणार स्पर्धेत लहान गटात भूषण चौकेकर व कल्पेश कोयघाडी यांनी प – थम क्रमांक मिळविला. तसेच समुह नृत्य स्पर्धेत लहान गटात शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या दोन्ही स्पर्धांमधील विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेत देवगडचे तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. स्पर्धेतील यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे, गटसमन्वयक अशोक जाधव, देवगड बीटचे विस्तार अधिकारी सुदाम जोशी, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका सुमन चोपडे, उपशिक्षिका श्रीमती दीपिका जांभवडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जनार्दन कोयघाडी व सर्व सदस्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.