मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रगत विद्यामंदिर रामगड व टोपीवाला हायस्कुलची विज्ञान प्रतिकृती प्रथम

मालवण,दि.२० डिसेंबर 

मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थीनिर्मित विज्ञान प्रतिकृतीमध्ये प्राथमिक गटात प्रगत विद्यामंदिर रामगड च्या भक्ती नागेश परब हिने तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल मालवणच्या ओम चंद्रशेखर आंबेरकर याने प्रथम क्रमांक पटकाविला.

मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव या शाळेमध्ये संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या हस्ते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मालवणचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जि. प. सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी श्री. शेर्लेकर, मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे चिटणीस जी. एस. परब, सदस्य नंदकुमार राणे, कार्यक्रमाचे तथा शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय कांबळी, कार्यक्रमाचे आयोजक मालवणचे गटशिक्षणाधिकारी संजय माने, हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर, कांदळगाव ग्रामपंचायत सदस्या सौ. मधुरा परब, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक प्रतापराव खोत, विज्ञान प्रतिकृती परीक्षक काळसे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. पेडणेकर, श्री लिंगेश्वर हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुडाळचे प्रा. श्री. राठोड, श्री मोरेश्वर गोगटे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्रा.श्री. कर्ले, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बेळेकर, तंत्रनिकेतन मालवणचे श्री. तलवारे, तांत्रिक विद्यालय मालवणचे श्री. जमादार, कक्तृत्व व निबंध स्पर्धेचे परीक्षक अध्यापक महाविद्यालय मालवणचे प्रा. नागेश कदम, संग्राम कासले, केंद्रप्रमुख श्रीकृष्ण बागवे आदी व अन्य मान्यवर उपस्थित होते

मालवण तालुका विज्ञान प्रदर्शनातील विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे :- -विद्यार्थीनिर्मित विज्ञान प्रतिकृती प्राथमिक गट- प्रथम भक्ती नागेश परब -प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय लावण्य दीपक गोसावी- जीवन शिक्षण विद्यामंदिर कोळंब नंबर १, तृतीय आदित्य देविदास प्रभूगावकर -अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण. माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-प्रथम ओम चंद्रशेखर आंबेरकर- अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवण, द्वितीय ओमतेज उल्हास तारी- प्रगत विद्यामंदिर रामगड तृतीय कुणाल जाधव-डॉक्टर एस. एस. कुडाळकर हायस्कूल,मालवण.

प्राथमिक शिक्षकनिर्मित विज्ञान प्रतिकृती – प्रथम – गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर -जि. प. शाळा मसुरे देऊळवाडा, द्वितीय -सौ.प्रिया सुनील मेस्त्री – जि. प. प्राथमिक शाळा हिवाळे नं.१, तृतीय – देविदास नामदेव प्रभूगावकर-जि. प. प्राथमिक शाळा चाफेखोल नं.१., माध्यमिक व.उच्च माध्यमिक शिक्षकनिर्मित विज्ञान प्रतिकृती – प्रथम- विष्णु दत्तराम काणेकर- त्रिमूर्ती माध्यमिक विद्यामंदिर शिरवंडे, द्वितीय – मिलिंद मधुसूदन गावकर- माध्यमिक विद्यालय असरोंडी, तृतीय- तुषार दशरथ सकपाळ-आर. ए. यादव हायस्कूल आडवली.

प्रयोगशाळा साहाय्यक परिचर निर्मिती विज्ञान प्रतिकृती- प्रथम – प्रकाश विश्वनाथ खोडके- ओझर विद्यामंदिर कांदळगाव, द्वितीय – विजय वामन लिंगायत- प्रगत विद्यामंदिर रामगड, तृतीय – संदीप आत्माराम धामापूरकर- श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे.

दिव्यांग विद्यार्थिनिर्मित विज्ञान प्रतिकृती- प्राथमिक- प्रथम – तेजस रामचंद्र केळुसकर- डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कूल देवबाग, द्वितीय- ओम महेश करावडे -भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके.
माध्यमिक व उच्च माध्यमिक दिव्यांग विद्यार्थिनिर्मित विज्ञान प्रतिकृती – प्रथम – ओमकार पंकज राणे- प्रगत विद्यामंदिर रामगड.

निबंध स्पर्धा– प्राथमिक- प्रथम- आदित्य देविदास प्रभुगावकर- टोपीवाला हायस्कुल मालवण, द्वितीय- यशश्री गुरुनाथ ताम्हणकर- न्यू इंग्लिश स्कूल माळगाव, तृतीय- गौरी निलेश घाडीगावकर- प्रगत विद्यामंदिर रामगड. माध्यमिक व उच्च माध्यमिक- प्रथम- वैभवी विद्याधर मेस्त्री- टोपीवाला ज्युनिअर कॉलेज मालवण, द्वितीय- नीरजा संजय परब- प्रगत विद्यामंदिर रामगड, तृतीय- वेदिका मंगेश परब – सौ.इं.द.वर्दम हायस्कूल पोईप.

वक्तृत्व स्पर्धा -प्राथमिक- प्रथम- मनस्वी पल्लव कदम-जि. प. प्राथमिक शाळा अडवली नं.१, द्वितीय- पार्थ प्रदीप सामंत- टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय- प्रिया विलास पेंडूरकर- न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर.

वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक- प्रथम- वेदांत शिवप्रसाद नाईक- टोपीवाला ज्युनिअर कॉलेज मालवण, द्वितीय- सेजल सत्यवान केळुसकर- ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी, तृतीय- सौरवी गंगाराम देसुरकर -भंडारी ज्युनिअर कॉलेज मालवण.

प्रश्नमंजुषा स्पर्धा- प्राथमिक-
प्रथम – तृप्ती दीपक परुळेकर व प्रांजली संजय कुंभार- ओझर विद्यामंदिर कांदळगाव, द्वितीय- तन्वी जगदीश घाडीगावकर व ओंकार सुनील लाड -आर. ए. यादव हायस्कूल आडवली, तृतीय- अदिती गुरुप्रसाद परब व भाविक दीपक देसाई- रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल मालवण. प्रश्नमंजुषा – माध्यमिक व उच्च माध्यमिक -प्रथम- श्रेयस चंद्रशेखर बर्वे व निशांत शरद धुरी- टोपीवाला हायस्कूल, द्वितीय- धृती केशव भोगले व विराज विश्वनाथ परब- भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे, तृतीय- संचिता संदेश परब व भूमिका सदानंद कोचरेकर- ओझर विद्यामंदिर कांदळगाव.

पारितोषिक वितरण व समारोप

या विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई येथील उद्योजक तथा मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दीपक परब व प्रमुख पाहुण्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती यू. डी. मुरवणे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस जी. एस. परब, सदस्य नंदकुमार राणे, शाळेचे माजी विद्यार्थी जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी प्रशांत पारकर, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय कांबळी, विशाल राणे, शेखर राणे, केंद्रप्रमुख श्री. श्रीकृष्ण सावंत, डॉ. उज्ज्वल मुरवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारकर यांनी केले तर आभार पी. के. राणे यांनी मानले.