मालवणात भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट

मालवण,दि.२० डिसेंबर 

वाईल्ड रेस्क्यूअर, सिंधुदुर्गतर्फे भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसविण्याचा उपक्रम मालवण शहरात सुरू करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व अॅन्टी रेबिज इंजेक्शन देऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला. भटक्या जनावरांपासून अपघात घडू नयेत तसेच मुक्या प्राण्यांचे जीव वाचावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके, डॉ. प्रसाद धुमक, सल्लागार शिल्पा यतीन खोत, संदीप चिऊलकर, दीपक दुतोंडकर, कृष्णा कदम, प्रवीण सरकारे, प्राणीमित्र आनंद बांबार्डेकर व स्वप्नील परुळेकर, अंकिता मयेकर, मनीषा पारकर, शांती तोंडवळकर, महेश वालीकर उपस्थित होते.

आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून शहरात सर्वत्र व्यापक प्रमाणावर कुत्र्यांना अॅन्टी रॅबीज इंजेक्शन व कुत्रे निर्बिजीकरण करण्याचा संकल्प असून यासाठी इतर संस्था किंवा प्राणिमित्र यांनी पुढाकार घ्यायचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके, प्रसाद धुमक व सल्लागार शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे. यासाठी ९४२२४३६२४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती देण्यात आली.