दोडामार्ग, दि. २० डिसेंबर
दोडामार्ग चंदगड तालुक्याला तसेच शिवकालीन पारगड किल्ला याला जोडणारा मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता तसेच चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अपूर्ण राहिले आहेत यामुळे नागरीकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी अधिवेशनात वरील विषयाकडे अध्यक्ष यांचे लक्ष वेधून तातडीने कामे पूर्ण करावी अशी मागणी केली.
महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेल्या मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता काम गेल्या चार वर्षापासून रखडले आहे. संबंधित ठेकेदार बांधकाम विभाग यांच्या हलगर्जीपणा मुळे वन विभाग यांनी दिलेल्या मुदतीत काम केले नाही. अठरा महिने कालावधी फक्त आठ महिने काम केले ते अपूर्ण यामुळे वन विभाग यांनी काम रोखले. चार वर्षे बंद आहे. जर वेळेत काम केले असते तर एव्हाना वाहतूक सुरू झाली असती.
मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता कामाला सुरुवात करावी अशी मागणी करुन आंदोलन उपोषण करून देखील वन विभाग बांधकाम विभाग यांनी लक्ष दिले नाही. आणि आता वन विभाग कडे मुदतवाढ प्रस्ताव सादर केला रक्कम जमा केली आहे सांगितले जात आहे.
चंदगड आमदार शिवाजीराव पाटील हे प्रचारानिमित्त पारगड किल्ला येथे आले असता स्थानिक ग्रामस्थ यांनी मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता इतर रस्ते याकडे रघुवीर शेलार यांनी तसेच इतर ग्रामस्थ यांनी लक्ष वेधले होते. यावेळी शिवाजीराव पाटील यांनी आपण निवडून आल्यानंतर अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करु असे सांगितले होते. त्या नुसार अधिवेशनात मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता तसेच चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते इतर समस्या उपस्थित करून अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय यांचे लक्ष वेधले.