दोडामार्ग, दि. २० डिसेंबर
साटेली भेडशी भोमवाडी येथे तिलारी उजव्या कालव्याच्या ठिकाणी असलेल्या पुलाच्या ठिकाणी संरक्षण कठडा नसल्याने वाहने कालव्यात पडून लोकांचा नाहक बळी जात आहे. या ठिकाणी संरक्षण कठडा असता तर गाडी कालव्यात पडली नसती महिलेचा मृत्यू झाला नसता तेव्हा संभाव्य अपघात टाळण्यासाठी ज्या ठिकाणी रस्ता क्राॅस करून डावा उजवा कालवा गेला आहे. अशा ठिकाणी तातडीने संरक्षण कठडा कामाला सुरुवात करावी. अन्यथा १५ जानेवारी रोजी साटेली भेडशी भोमवाडी अपघात घडला तेथे ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या साटेली भेडशी ग्रा. प. माजी सदस्या जेनिफर मार्शल लोबो हिने दिला आहे. तसे निवेदन कालवा विभाग कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
तिलारी पाटबंधारे विभाग याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या अगोदर देखील कालव्यात वाहने पडून अपघात झाले आहेत. तिलारी धरणाचा डावा उजवा कालवा हे दोडामार्ग ते तिलारी, कुडासे ते साटेली सासोली भटवाडी दोडामार्ग बांदा रस्ता डावा कालवा साटेली खानयाळे साटेली बोडक
दरम्यान रस्त्याखालून गेले आहेत. वर पुल बांधली आहेत. एकाही ठिकाणी संरक्षण कठडा नाही असे म्हटले आहे.