सावंतवाडी,दि. २१ डिसेंबर
ज्ञानदीप संस्थेच्या वतीने सलग अठरा वर्षे उपक्रम राबविले जातात.विधायक कार्याचं कौतुक केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी करून येत्या दि.२५ डिसेंबर रोजी होणाऱ्या सन्मान सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची खात्री दिली.
ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त सावंतवाडी येथे उपस्थित राहणार आहे.सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देणं ही माणुसकी जपणारे पदाधिकारी ज्ञानदीप मंडळात आहेत हे अभिमानास्पद आहे, असे ते म्हणाले.
यावेळी निमंत्रण मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते राजन मडवळ, संस्थापक वाय पी नाईक आदींनी त्यांना दिले.