देवगड पोलिसांची कारवाई!
देवगड,दि. २१ डिसेंबर
देवगड तालुक्यातील पोयरे मशवी वाडी येथील घराच्या मागील मोकळ्या जागेत अवैध विनापरवाना गोवा बनावटीची दारू लपवून ठेवून त्याचा विक्रीचा धंदा करत असल्याचे गोपनीय माहिती देवगड पोलिसांनी मिळताच देवगड पोलिसांनी या ठिकाणी शनिवारी सकाळी छापा टाकून गोवा बनावटीची बिगर परवाना १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त केला.
या प्रकरणी पोयरे मशवी वाडी येथील संशयित आरोपी योगेश विलास मयेकर यांच्या विरोधात देवगड पोलिस हेड कॉन्स्टेबल स्वप्निल ठोंबरे यांनी ही देवगड पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
ही कारवाई शनिवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास संशयित आरोपीच्या घराच्या मागील बाजूस घडली या छाप्यात ब्ल्यू अशियन बॉब्ज लेमन व्होडका २१ बॉक्स १८० च्या एकू बाटल्या प्रति बाटली रु १००/ याप्रमाणे १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल त्याचबरोबर हनी ब्लेंड ब्रँडीच्या १८० मिली च्या ४३२ बाटल्या रक्कम रुपये ४३ हजार २०० असा एकूण १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीचा बिगर परवाना अवैध दारू साठा देवगड पोलिसांनी हस्तगत केला या मोहिमेत देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक संतोष भालेराव
पोलीस हवालदार गणपती गावडे ,विठ्ठल कोयंडे ,पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल ठोंबरे ,निलेश पाटील ,महिला पोलीस नाईक प्राची धोपटे ,सांनवी चोपडेकर यांनी सहभाग घेतला.
: वरील वर्णनाचा व किमतीचा प्रॉव्हि.माल गैरकायदा बिगर परवाना बाळंगलेल्या स्थितीत मिळून आल्याबद्दल या घटनेतील संशयित आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई)नुसार कारवाई करण्यात आली आहे.