३ जानेवारी पासून दृष्टी बाधितांचे साडेतीन महिन्यांचे मोफत निवासी शिबिर घेण्यात येणार

सावंतवाडी दि.२१ डिसेंबर 

नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इंडिया मुंबई यांच्यामार्फत येत्या ३ जानेवारी पासून दृष्टी बाधितांचे साडेतीन महिन्यांचे मोफत निवासी शिबिर महालक्ष्मी वरळी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
या शिबिरात सर्व प्रकारचे नित्य उपयोगी बोलणे, ब्रेल लिपी, योगासने, संवाद हे विषय शिकविण्यात येतील. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांची वयोमर्यादा १८ ते ६५ वर्ष अशी आहे. आपण सिंधुदुर्ग अथवा नॅब इंडिया मुंबई यांच्याशी मोबाईल नंबर 917718007013
येथे संपर्क साधावा असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अनंत उचगावकर यांनी केले आहे.