देवगड,दि.६ फेब्रुवारी
श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, श्री. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, ओरोस आणि कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत भारत अभियान अंतर्गत स्वयंरोजगाराला चालना देणे व फळबागायतीला पूरक व्यवसाय निर्मिती व्हावी या उद्देशाने श्री. स. ह. केळकर महाविद्यालय येथे फळ प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेमध्ये श्री. छत्रपती शिवाजी कृषी महविद्यालय, ओरोस येथील प्रा. भावना पाताडे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहज उपलब्ध होणाऱ्या आणि कोकणातील फळांपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांविषयी माहिती देऊन प्रात्याक्षिके उत्तमरित्या सादर केली. श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी फळप्रक्रिया उद्योग स्वयंरोजगार निर्मितीसाठी कशाप्रकारे आवश्यक आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले आणि सदर कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेसाठी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यानी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी सुद्धा या कार्यशाळेचा लाभ घेतला.
उन्नत भारत अभियान समन्वयक यांनी उन्नत भारत अभियान अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर कार्यशाळाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिक्षण विकास मंडळ, देवगड संस्थेच्या पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजन समितीचे अभिनंदन केले.