खारेपाटन येथे सकाळी 9.30 वाजता होणार जल्लोषी स्वागत ; जंगी स्वागताची तयारी पूर्ण
कणकवली,दि.२१ डिसेंबर
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री पदी नितेश राणे विराजमान झाल्यानंतर 22 डिसेंबर रोजी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात खारेपाटण ते दोडामार्ग पर्यंत असे ना. नितेश राणे यांचे जल्लोषी स्वागत भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून केले जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील पदाधिका-यांनी नियोजन केले असून जिल्ह्यात भाजपाचे झेंडे , स्वागताचे बॅनर लावल्यामुळे मोठी वातावरण निर्मिती झाली आहे. सायंकाळी 7 वाजता कणकवलीत भव्यदिव्य स्वरुपात ना. नितेश राणे यांचा नागरी सत्कार होणार आहे.
कॅबिनेट मंत्री नितेश नारायण राणे यांचा 22 डिसेंबर रोजी नियोजित रोजी सकाळी 9:30 वाजता खारेपाटण येथे आगमन होईल , तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत होईल. त्यानंतर पडेल तिठा – देवगड येथे 11 वाजता भाजप कार्यालयात स्वागत होणार आहे. दुपारी 11:30 वाजता देवगड भाजप कार्यालय येथे ना. नितेश राणे भेट देतील त्याठिकाणी जल्लोषी स्वागत होणार आहे.
तळेबाजार येथे ना. नितेश राणे 12:30 वाजता स्वागत होईल, दुपारी 1 वाजता शिरगाव बाजारपेठ बाजारपेठ येथे स्वागत, त्यानंतर 1:30 वाजता नांदगाव तिठा येथे ना. नितेश राणे यांचे भव्यदिव्य स्वागत होणार आहे, त्यानंतर कुडाळ – सिंधुदुर्गनगरी येथे भाजपा जिल्हा कार्यालयात दुपारी 2 वाजता ना. नितेश राणे भेट देणार त्याठिकाणी कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक येथे 3 वाजता स्वागत, त्यानंतर सावंतवाडी, बांदा येथे 3:30 वाजता ना. नितेश राणे यांचा सत्कार सोहळा होईल.
त्यानंतर दोडामार्ग ना. नितेश राणे यांचा 4:30 वाजता सत्कार सोहळा कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता कुडाळ येथे स्वागत समारंभ, त्यानंतर कणकवली येथे 7:30 वाजता मंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार सोहळा कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.