श्री काशीविश्वेश्वर मंदिरात २३ पासून हरिनाम सप्ताह

कणकवली,दि.२१ डिसेंबर

प.पू. भालचंद्र महाराज संस्थानच्या श्री काशिविश्वेश्वर मंदिरात बेळगांव निवासी परमपूज्य आई श्री कलावतीदेवी यांच्या शिकवणुकीप्रमाणे व श्री हरिमंदिरातील भक्तमंडळींच्या मार्गदर्शनाखाली २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त सकाळी ७.३० ते ९ वा. प्रातः स्मरण भजन व वाचन, सायं. ४ ते ५.३० वा. सायंस्मरण भजन व वाचन, रात्रौ ९ ते १०.३० वा. चातुर्मासानंतर एकादशीचे भजन व प्रदक्षिणा, रविवार २९ रोजी स. ७.३० ते ९ वा. प्रातः स्मरण भजन व बालगोपाळांसाठी बालोपासना होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे