दोडामार्ग,दि.२१ डिसेंबर
दोडामार्ग ते विजघर मार्गावर शनिवारी सकाळी मेढे ते पाळये दरम्यान एका वळणावर एक कारण तसेच बुलेट मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात हेवाळे गावातील युवक पुथीराज देसाई हा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला मार लागला आहे. तर हाताला खरचटले आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. स्थानिकांनी मोटार सायकल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली होती.
गोवा येथील काही जण अल्टो कार जी. ए. ०३ झे. ०९५८ घेऊन विजघर कडे जात होते तर पुथीराज देसाई हा आपली बुलेट मोटार जीए. ०८ ए. एम. ०५७० घेऊन साटेली भेडशी येथे जात असताना मेढे पाळये दरम्यान गेल गॅस पाईप लाईन कार्यालय नजीक कार मोटार सायकल दरम्यान जोरदार धडक बसली.
झालेल्या अपघातात हेवाळे गावातील युवक पुथीराज देसाई याच्या पायाला हाताला मार लागला. अपघात होताच स्थानिक ग्रामस्थ तसेच इतर वाहन धारक कार मधील इसम तसेच हेवाळे गावातील युवक यांनी तसेच इतरांना जखमीला इतर वाहनातून उपचारासाठी स्थानिक आरोग्य केंद्र रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. या नंतर पुढील उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले.
झालेल्या अपघातात अल्टो कार बुलेट मोटार सायकल यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघात मुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघात झाला तेथे वळण आहे. या वळणावर वाढलेली झाडी तोडावी अशी मागणी करुन देखील दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणी या अगोदर देखील अपघात झाले आहेत.