भितीने पळाला इतर फळ झाडांचे मिळून एका रात्रीत लाखोचे नुकसानशेतकरी हवालदिल
दोडामार्ग, दि. २१ डिसेंबर
गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या जंगली टस्कर राजा हत्तीने तिलारी खोऱ्यात उच्छाद मांडला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हेवाळे गावात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जंगली टस्कर राजा हत्तीने
चक्क लागून लागून घरे असलेल्या लोकवस्ती मध्ये शिरकाव शुक्रवारी सुर्यकांत देसाई यांच्या बागेतील भला मोठ्या भेल्या माड ढकलून मोडून चक्क पाळीव जनावरे बांधलेल्या तानाजी श्रीपत देसाई यांच्या गोठ्यावर टाकला यामुळे बांधलेल्या गुरांच्या अंगावर पञे लाकडे पडली. यात हत्ती ओरडला गुरे घाबरली बाहेर पडण्याचा मार्ग बंद त्यामुळे गुरांच्या गळ्यात बांधलेली दावी कापून सुटका करावी लागली. यात गाय बैल जखमी झाला. बैल घाबरून पळाला तो सापडला नाही. जंगली टस्कर राजा हत्तीने एका रात्रीत बागायती गोठ्याचे मिळून लाखोचे नुकसान केले आहे.