शिवजयंतीनिमित्त मालवणात चित्रकला व रांगोळी स्पर्धा

मालवण,दि.६ फेब्रुवारी

मालवण येथील सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त १८ फेब्रुवारीला राजकोट किल्ल्यावर मालवण तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा १५ वर्षाखालील लहान गट आणि खुला गट अशा दोन गटामध्ये होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्पर्धा सुरु होईल. चित्रकला व रांगोळी स्पर्धेसाठी श्री रामभूमी अयोध्या नगरी व छत्रपती शिवाजी महाराज या दोन विषयावर आपली कला सादर करायची आहे. चित्रकला स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी ड्रॉईंग पेपर आयोजकांकडून देण्यात येईल. स्पर्धेत प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजकोट येथे करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणीकरिता अंतिम १७ फेब्रुवरी राहील. स्पर्धे संदर्भातील अधिक माहिती करीता ९२०९३३३०१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाकडून देण्यात अली आहे.