मालवणात जलरंग मत्स्यालयाचा शुभारंभ

मालवण,दि.२१ डिसेंबर
मालवणच्या पर्यटन क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या किल्ले सिंधुदुर्ग सह जलक्रीडाच्या माध्यमातून मालवणचे पर्यटन फोफावत असतानाच मालवणात मत्स्यालयाची असलेली उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने मालवण सागरी महामार्गवरील कोळंब पुलानजीक जलरंग या मत्स्यालयाचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते करण्यात आला.

मालवणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. यातील बहुतांश पर्यटकांना मत्स्यालयाचे आकर्षण असते. मात्र मत्स्यालय नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत होता.आता
मालवण सागरी महामार्गावर कोळंब पुलानजीक ‘जलरंग’ या मत्सालयाचा शुभारंभ झाला या मत्सालयात शोभिवंत मासे फ्लूरोसंट विडो, एंजल्स, टायगर, पिहाना, किसिंग गुरामी सारखे रंगीबेरंगी आणि विविध आकाराचे मासे तसेच एलीगेटर आणि अर्बना सारखे मोठ्या आकाराच्या माशांचा अद्भुत खजाना पाहण्याची संधी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत मिळणार आहे. पाण्यातील रंगीबिरंगी अद्भुत दुनिया पाहण्याचा आनंद घेण्याचे आवाहन उद्योजक डॉ. दीपक परब, पर्यटन तज्ञ गुरु राणे यांनी केले आहे.