नागवे भटवाडी येथील जिवाबा सुतार यांचे निधन

कणकवली,दि.२१ डिसेंबर
नागवे भटवाडी येथील रहिवासी जिवाबा गणू सुतार (वय ७०) यांचे २० डिसेंबर रोजी शुक्रवारी रात्री ११.२० वा. वृद्धापकाळाने निधन झाले. ते गावात आबा सुतार या टोपण नावाने परिचित होते. सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असायचा. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात भाऊ, भाऊजय, मुलगा, सून, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे.