कणकवली,दि.२१ डिसेंबर
बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या कौस्तुभ राणे या विद्यार्थ्याने SOF आंतरराष्टरिय सामान्य ज्ञान ऑलिंपियाड (KGKO 2024-25) मध्ये अपूर्व यश मिळवले आहे.कौस्तुभ राणे याने प्रशालेत पहिला क्रमांक मिळवत नुसत्या शाळेचे नावच नाही तर झोनल स्तरावर ४ था, प्रदेशिय स्तरावर ५ वा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर १० वा क्रमांक मिळवत शाळेचा मान उंचावला आहे .
कौस्तुभने या स्पर्धेत ९५ टक्के गुण मिळवत ९९.७७ टक्के गुण प्राप्त केले. त्याला या यशाबद्दल गोल्ड मेडल ऑफ डिस्ट्रिक्शन प्रमाणपत्र आणि झोनल उत्कृष्टता दिले गेले. याशिवाय भेटवस्तु देण्यात आली आहे.
SOF इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड 2024-25 मध्ये बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी असाधारण यश मिळवले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे शाळेला अभिमान आणि गौरव प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करून अनेक सुवर्णपदकं आणि मान्यतापत्रे मिळवली आहेत.
सुवर्ण पदक विजेत्यांचा गौरव
या वर्षीचे गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन मिळवणारे विद्यार्थ्यांमध्ये ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रणव विनोद जाधव, दीपक रुकाराम प्रजापत, ओंकार विनोद जाधव, भरत रुकाराम प्रजापत, ज्ञानपरी किसन ठोंबरे, कावेरी हनुमंत वाघमोडे, जिया ज्ञानदेव साउळ, रविकुमार नरपतराज माली, आर्यन बालकृष्ण जाधव, रितिका अर्चना आंभोरकर, आणि सान्वी गणेश वाघाटे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकासोबतच सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन आणि स्टुडंट प्रोग्रेस रिपोर्ट प्रदान करण्यात आले.
विशेष सुवर्ण पदक विजेत्यांचा गौरव
पुजा असित दुले,तनिष्का संदीप सावंत, आणि वेदिका मंगेश जाधव यांना विशेष सुवर्ण पदक आणि सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थ्यानी कठोर परिश्रम योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. या यशामुळे शाळेच्या गुणवतेची आणि क्षमतेची दखल घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे तसेच संस्थेचे संचालक संदीप सावंत प्रशालेच्या, मुख्याध्यापिका श्रीमती अनघा राणे आणि शिक्षकवर्ग यांनी मुलांचे कौतुक केले व त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छ दिल्या.