४५ जेसीबी व क्रेन माध्यमातून भव्य दिव्य स्वागताची तयारी; भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागतासाठी गर्दी
कणकवली दि २२ डिसेंबर
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताची खारेपाटण येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात नितेश राणे यांचे स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. ना नितेश राणे यांच्या स्वागतासाठी ४५ जेसीबी,२ क्रेन च्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी ना.नितेश राणे यांचा स्वागतासाठी खारेपाटन येथे गर्दी केली आहे.