PG ग्रुप चे सर्वेसर्वा उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शिवप्रतिमा देऊन मंत्री नितेश राणे यांचा जाहीर सत्कार
देवगड, दि. २२ डिसेंबर
कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांची राज्याच्या मत्स्य व बंदर विकास मंत्रीपदी निवड झाली. या निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ना.राणे आल्याने जनमानसात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पहील्यांदाच ना. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले.देवगड जामसंडे शहराच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी PG ग्रुप चे सर्वेसर्वा उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शिवप्रतिमा देऊन मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला
युवा शहराध्यक्ष दयानंद पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सय्यम सोमन,ओंकार सारंग,किरण पाटील,गोविंद माली,जीवन रामाणे,शशांक सकपाळ आधी पदाधिकारी उपस्थित होते.