नवनिर्वाचित मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम नितेश राणे यांनी जामसंडे येथे स्वागत समारंभात
देवगड, दि.२२ डिसेंबर (दयानंद मांगले)
कणकवली विधानसभा मतदारसंघातील अन्य दोन तालुक्यांच्या तुलनेत देवगड तालुक्याने आपल्याला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले आहेत या देवगड तालुक्याची तुलना अन्य तालुक्यांशी होत नाही देवगड मधील जनतेने निस्वार्थीपणे प्रेम करून आशीर्वाद दिले म्हणूनच या क्षणापासून देवगडचा आमदार मंत्री होत नाही असे यापुढे होणार नाही व हा ठपका कॅबिनेट मंत्री बनवून कायमस्वरूपी पुसून टाकला आहे.
या मतदारसंघाच्या विकासासाठी येथील जनतेला विश्वास देत असताना मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिली आठवण ही देवगडची झाली देवगड तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीच्या भावना व विषय व त्यांचा प्रवास याची पूर्ण माहिती आपल्याला माहीत असून आपण आमदार बनू नये म्हणून फूट पाडणारे आता घरात बसले आहेत आणि मी मंत्री झालो आहे असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
देवगड वासिया जनतेने दिलेले प्रेम शब्दात व्यक्त न करता प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी निश्चितपणे यापुढील काळात देत असताना देवगड तालुक्यातील अथवा मतदार संघातील संपूर्ण जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांच्या समस्या, मागण्या, रखडलेले बंदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरता व या भागाचा सर्वांगीण विकासासाठी आपण या पुढील काळात देखील जनतेसोबत राहून सेवा करणार आहे. असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्र शासनाचे नवनिर्वाचित मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम नितेश राणे यांनी जामसंडे येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभात बोलताना केले यावेळी त्यांचा देवगड तालुका भाजपा तसेच युवा मोर्चाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आल.
कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम.,नितेश राणे यांनी विजयी हॅट्रिक करून महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय व बंदर विकास कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल देवगड जामसंडे शहर भाजपच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत जामसंडे येथील भाजप कार्यालयासमोर करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर माजी आम.अजित गोगटे ,भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,भाजप जिल्हा निमंत्रक बाळ खडपे,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर,जेष्ठ भाजपा कार्यकर्ते मुकुंदराव फाटक ,तालुका अध्यक्ष राजू शेट्ये,शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर,गटनेते सरचिटणीस शरद ठुकरुल,उपनगराध्यक्षा मिताली सावंत,नगरपंचायत बांधकाम सभापती प्रणाली माने,महिला अध्यक्ष उषकला केळुसकर,शहर अध्यक्ष तन्वी शिंदे, भाजप शहर अध्यक्ष योगेश पाटकर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील,शक्ती केंद्र प्रमुख गणपत गावकर,उल्हास मणचेकर,मिलिंद माने,नगरसेविका तन्वी चांदोस्कर रुचाली पाटकर व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
या स्वागत सोहळ्यात,।मत्स्यव्यवसाय आयुक्त विभागाचे सहा., विकास अधिकारी श्रीधर अलगिरी,बंदर निरीक्षक, अविनाश ताम्हणकर,मत्स्यपर वाना अधिकारी पार्थ तावडे,चिन्मय जोशी,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रशीद खान,प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे,देवगड मच्छिमार सोसायटी चेअरमन द्विजकांत कोयंडे,तारामुंबरी मच्छिमार सोसायटी चेअरमन विनायक प्रभू,जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर,तालुका अध्यक्ष शैलेश कदम,यांनी नाम.नितेश राणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.या बरोबरच भाजप,युवा मोर्चा,महिला आघाडी,आंबा उत्पादक,सन्मित्र मंडळ जामसंडे,इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संस्था,बॉम्बे विद्यापीठ टीचर्स युनियन,उद्योजक प्रकाश गायकवाड, भाजप नगरसेवक,नगरसेविका,व्यापारी पर्यटन संस्था,जल्लोष समिती,शासकीय निमशासकीय कार्यालय,तालुक्यातील सरपंच,उपसरपंच पत्रकार बांधव,यांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.सुहासिनी औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिषबाजीत नाम.नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले.