दारात उभ्या केलेल्या क्रेटा कारचे केले नुकसान हत्ती बंदोबस्त नेमलेले कर्मचारी भलल्या ठिकाणी वन विभाग यांच्या कारभाराबाबत तीव्र संताप
जंगली हत्ती सांभाळता येत नसेल तर आम्हाला येथून घालवा गाव जंगल ताब्यात घ्या संतप्त शेतकरी यांचा वन विभाग याना सवाल
जंगली हत्ती बंदोबस्त निर्णय का? घेतला जात नाही? एक हत्ती आवरत नसेल तर हातात बांगड्या भरा
दोडामार्ग, दि. २२ डिसेंबर
हेवाळे गावात दाखल झालेल्या जंगली टस्कर राजा हत्तीने प्रंचड दहशत माजवली आहे. अतोनात नुकसान करत असताना वन अधिकारी व कर्मचारी केवळ बघ्यांची भूमिका घेत आहेत. वरिष
अधिकारी फिरखत देखील नाही. शुक्रवारी रात्री हेवाळे गावात गुरांच्या गोठ्यावर भैल्या माडाचे झाड टाकून लाखो रुपये नुकसान केलेल्या जंगली हत्तीने शनिवारी रात्री हेवाळे बांबर्डे गावात एकूण तीस नारळाच्या झाडांचे नुकसान केले. केळी झाडांचे नुकसान करत घरासमोर उभी करून ठेवलेल्या क्रेटा कारचे नुकसान केले. पण वन विभाग कडून वेळीच दखल घेतली नाही . वन अधिकारी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत जर हत्ती बंदोबस्त जमत नसेल तर आम्हाला येथून घालवा गाव जंगल तुमच्या ताब्यात घ्या. एक हत्ती सांभाळता येत नाही तर वन अधिकारी यांनी हातात बांगड्या भरा असा इशारा दिला.
जंगली हत्ती कुठे आहे. याचा अंदाज घेण्यासाठी दहा लाख रुपये खर्च करून ड्रोन कॅमेरा आणला तो बंद कशाला याचा वापर कशासाठी नाही. शिवाय जंगली हत्ती बंदोबस्त करण्यासाठी नेमलेली टीम बिन कामाची आहे. ते फक्त गाडी घेऊन भलत्याच ठिकाणी फिरत असतात खाली उतरत नाही. विचारले तर आमची ड्युटी संपली अशी बेजबाबदार उत्तरे दिली जातात असे सांगून या ठिकाणी उशिरा आलेले कोनाळ वनपाल किशोर जंगले याना संतप्त शेतकरी यांनी फैलावर घेतले. जेष्ठ ग्रामस्थ व्यंकटेश देसाई, माजी सरपंच राजाराम देसाई, तानाजी देसाई, यांनी वन विभाग यांच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.