मोती तलावाच्या काठावर सावंतवाडी महोत्सव २०२४ २९ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी आयोजन

सावंतवाडी दि.२२ डिसेंबर 

सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर येत्या दि.२९ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत सावंतवाडी महोत्सव २०२४ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून ४० ते ४५ स्टाॅल देखील असतील. फूड स्टॉल हे या महोत्सवाचे आकर्षण ठरेल.
शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी ही माहिती दिली. यावेळी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,इनरव्हील च्या प्रा सुमेधा नाईक, रोटरी क्लबचे प्रमोद भागवत गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, स्वप्ना नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, सायली हडवडेकर, अर्चित पोकळे, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.
आमदार दीपकभाई केसरकर मित्र मंडळ, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब आणि इनरव्हील क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता या महोत्सवा च्या शुभारंभ करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये लोककला, संगीत, स्थानिक मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणारे स्टॉल, खाद्य स्टॉल हे महोत्सवाचे आकर्षण असेल.
येत्या २९ डिसेंबर रोजी सावंतवाडी महोत्सव २०२४ चे उद्घाटन कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होईल. रात्री आठ वाजता आर्केस्ट्रा साज दे संगीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात धनश्री कोरगावकर महाराष्ट्र ची हास्य जत्रा, सुर नवा ध्यास नवा फेम ही कलाकार असेल रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब सावंतवाडी यांच्या माध्यमातून तसेच आमदार दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यामन हा कार्यक्रम होईल.
दि.३० डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पासून इनरव्हील क्लब सावंतवाडी व आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने ब्युटी क्वीन किंवा मिस सावंतवाडी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी रिया रेडीज व देवता हावळ यांच्याशी संपर्क साधावा.
नववर्षाच्या स्वागतासाठी दि.३१ डिसेंबर रोजी आमदार दीपक केसरकर मित्र मंडळ आयोजित आवाज आर्ट इव्हेंट निर्मित बेधुंद जल्लोष नववर्षाचा २०२५ हा कार्यक्रम होईल. यावेळी सुप्रसिद्ध गायक शैलेश पाटोळे आणि त्यांचे साथीदार वाद्य कलाकारांचा आर्केस्ट्रा होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक गायिका उपस्थित राहणार आहेत. यावेळी इंडियन आयडॉल फेम गायक राहुल खरे सुर नवा ध्यास नवा महाविजेती सनिता धापटे शिंदे सारेगम मराठी समृद्ध चोडणकर यासोबत झी मराठी ड्रामा ज्युनियर फेम आई यासारखे प्रतिबंधक कलाकार अशा २० कलाकारांची टीम नृत्य समूह सादर करणार आहेत याबरोबरच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटकांच्या आतषबाजी देखील होईल. दि.१ जानेवारी रोजी समारोप कार्यक्रम रात्री ८ ते ११ वाजता स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम निलेश मेस्त्री यांचे वाद्य वृंद आदी कार्यक्रम होणार आहेत.
या महोत्सवात ४० ते ४५ विविध प्रकारचे स्टॉल असतील. बालोद्यान मध्येच हे सर्व स्टॉल लावण्यात येणार आहेत. मंगळवारी आठवडा बाजार दिवशी पार्किंग व्यवस्थादेखील लोकांनी अडथळा होणार नाही अशी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.