मालवण,दि.२२ डिसेंबर
श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ मालवणतर्फे श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम मालवण आडवण येथील उत्तम चव्हाण यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी अधिव्याख्याते म्हणून डी.एड. कॉलेज मालवणचे प्रा. नागेश कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सातवीमध्ये शिकणारी कीर्तनकार वैदिका परशुराम लुडबे हिने गाडगेबाबांच्या विचारावर कीर्तन केले.
या कार्यक्रमात उत्तम चव्हाण यांनी गाडगे महाराज यांची वेशभूषा साकारली होती. यानंतर उत्तम चव्हाण यांनी भजन केले तर रात्री अनिल चव्हाण व मंडळी यांनी हरिपाठ केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ चिंदरकर, तालुका अध्यक्ष मोहन वालकर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सचिव विनायक चव्हाण, खजिनदार कृष्णा परुळेकर तसेच माजी नगरसेविका पूजा करलकर, माजी नगरसेवक आपा लुडबे, मुरली गोवेकर, उत्तम चव्हाण, जयवंत चव्हाण, अनिल चव्हाण, अजित चव्हाण, दिनानाथ चव्हाण, सुजीत नेमळेकर, अंकिता नेमळेकर, दत्तात्रय पाटकर, दीपक चव्हाण व इतर ज्ञाती बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदन सुरेश चव्हाण यांनी केले.