आदर्श व्यापारी संघटना, तळेरेच्या अध्यक्षपदी दशरथ गुरुनाथ कल्याणकर व सेक्रेटरी म्हणून आदित्य पंढरीनाथ महाडिक यांची निवड

तळेरे, दि. २२ डिसेंबर

आदर्श व्यापारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी दशरथ ऊर्फ (बाबू) गुरुनाथ कल्याणकर यांची तर सेक्रेटरी म्हणून आदित्य पंढरीनाथ महाडिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष – दशरथ गुरुनाथ कल्याणकर तर सेक्रेटरी -आदित्य पंढरीनाथ महाडिक आणि उपाध्यक्ष – अमोल गंगाराम सोरप, सह सेक्रेटरी – सचिन भिकाजी वाडेकर, खजिनदार – अभय मंगेश भांबुरे, सह खजिनदार – श्रीधर कल्याणकर यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून- चंद्रकांत (राजू) जठार, हनुमंत तळेकर, प्रवीण वरूणकर, राजेंद्र पिसे, निलेश तळेकर, अशोक तळेकर, चंद्रशेखर डंबे, वैभवकुमार कल्याणकर आणि सदस्य म्हणून मिथुन पटेल, योगेश मुद्राळे, सचिन पिसे, भवानीसिंह राठोड, सूरज बिद्रे यांची निवड करण्यात आली.
सर्व नूतन पदाधिकारीऱ्यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.