उध्दव ठाकरे पूर्ण पलटी मारण्याच्या तयारीत,त्यासाठी मोदी, शहा यांना दिल्लीत भेटीचे प्रयत्न

भाजपा आ.नितेश राणेंचा आरोप;म्हणूनच कोकण दौऱ्यात मोदींनी सुरु केलेल्या वंदे भारत ट्रेनचे कौतुक

कणकवली दि.६ फेब्रुवारी(भगवान लोके)

उद्धव ठाकरे इंडीया आघाडी सोडून भाजपमध्ये येण्यासाठी दिल्लीत शहा आणि मोदी यांना भेटीचा प्रयत्न केला जात आहे.
संजय राऊत यांचा मालक उध्दव ठाकरे पूर्ण करुन परत जात असताना वंदे भारत ट्रेन बाबत मोदींच कौतुक करत होते.उद्धव ठाकरे हे पलटी मारण्याच्या पूर्ण तयारीत आहेत.त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी सोबत तिकीट वाटप आणि दुसरीकडे भाजपासोबत युतीसाठी प्रयत्न ठाकरे करीत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

मोदींनी सुरु केलेल्या वंदे भारत ट्रेन मधून कोकणातून मुंबई ला जाण्याचे प्रयोजना मागे सुद्धा तेच कारण आहे. मी सांगतो ते खोटे असेल तर उध्दव ठाकरे यांनी आपल्या दोन्ही मुलांची डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी आणि महाराष्ट्राला व मित्र पक्षांना आघाडी सोडणार की नाही याची खरी माहिती द्यावी . नेहरु यांनी देशाला आळशी कसे बनवलं ह्याच उत्तम विश्लेषण पंतप्रधान मोदींनी केले. त्याबाबत मिरर्ची झोंबली की काँग्रेसचा कामगार असलेल्या संजय राऊत अग्रलेख लिहितो. पण तुझा मालक व मालकीण वंदे भारत ट्रेन ने मुंबईला गेले, ते मोदींजींचे कौतुक करतात. राऊत यांच्या टीका टिपण्णीला त्याचा मालक,मालकीण भीक घालत नाहीत हेच यातून दिसून आले.
तुझा मालक,त्यांची पोर व तुझे गुंडासोबतचे हनिमून चे फोटो आम्ही व्हायरल करतो.किंवा वेब सिरीज काढतो म्हणजे कळेल निलेश पराडकर व संजय राऊत यांचा काय संबंध, ह्याच पण उत्तर द्याव लागेल,असा इशारा नितेश राणे यांनी दिला .

महाविकास आघाडीच्या काळात गुंडांना कोण घेऊन फिरत होत ह्याचा अल्बम आम्ही दाखवतो. ८० कोटी लोकांना फुकट धान्य मोदी सरकारने दिले ते गोर गरिबांसाठी दिले.मोदी गोरगरिबांना मदत करणारे आहे. राऊत यांचे कुटुंब गरिबांची खिचडी खाणारे आहेत.मागील 10 वर्षे नोकऱ्या देण्याचं काम मोदी सरकार करत आहे. मात्र राऊत ने मुलीला वाईन कंपनी आणि आदित्य,तेजस ठाकरे यांना कंपनी यापलीकडे कोणाचा विचार उबाठा सेनेने केला नाही.तुझ्या सारख कुटुंबाचा विचार मोदी साहेब करत नाही ते देशाचा विचार करत आहेत. तुझ्या सारखी खिचडी चोरी मोदींनी नाही केली. गरिबांना अन्न दिलं.त्याला तुम्ही विरोध करता हे दुर्देवी आहे.महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे. त्यामुळे उबाठाला जागा वाटपात कशी भीक दिली जाते ते समजेल.

मालेगाव शहरात ३०० कोटी पेक्षा जास्त वीज चोरीचे सत्य मी मांडले होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमची बैठक झाली होती.आता अभिमानाने मी सांगतो त्या बैठकीचे पडसाद मालेगाव मध्ये पाहायला मिळत आहेत. मालेगाव मिनी पाकिस्तान म्हणण्याची वेळ का आली?ह्याचा पुरावा मी दिलाय. तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा होत असेल. तो असिफ शेख माजी आमदार आहे की पाकिस्तान चा एजंट आहे.आम्ही मालेगाव ला पाकिस्तान होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यात मी चुकीचं बोललो नाही,त्यामुळे मी माफी मागणार नाही. कायदेशीर उत्तर देईन,असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

विजय वडेट्टीवार यांना सरकार बदललं ह्याची माहिती नसेल. सकाळी उठून कडक चहा घ्या आणि शुद्धीवर या.रोहित पवार हा पवार गटाचा पप्पू आहे,अशी टीका नितेश राणे यांनी केली.