असलदे गावाच्यावतीने मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे जल्लोषी स्वागत

कणकवली, दि. २२ डिसेंबर
असलदे ग्रामपंचायत, असलदे सोसायटी व महायुतीच्या पदाधिकार्याच्यावतीने नांदगाव तिठा येथे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी ना. नितेश राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन असलदे गावाच्यावतीने सरपंच चंद्रकांत डामरे व चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ना. नितेश राणे यांनी विकासासाठी मंत्री म्हणून तुमच्या पाठीशी मी राहिन, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी , विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच सुरेश लोके , माजी चेअरमन प्रकाश परब , रघुनाथ लोके , बुथ अध्यक्ष संतोष परब, सोसायटी संचालक छत्रुघ्न डामरे , परशुराम परब , उदय परब , महेश लोके , शामू परब , संदेश आचरेकर ,मनोज लोके , किरण परब, संतोष घाडी, राजा परब, प्रदीप हरमलकर , प्रशांत परब आदी गावातील ग्रामस्थ उपस्थीत होते.