सावंतवाडी, दि. २२ डिसेंबर
कबड्डी खेळात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल स्थानावर होता, आता ही परंपरा पुढे सुरू ठेवली पाहिजे म्हणून जुने जाणते खेळाडूंनी येत्या २९ डिसेंबर रोजी स्नेहसंमेलन आयोजित केले आहे.
एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी आणि कबड्डी खेळाडू राज्यात सुप्रसिद्ध होते. येथील अनेक दिग्गज कबड्डीपटूंनी आपल्या खेळाने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. मात्र अलीकडच्या काळात हे वैभव कुठेतरी हरवल्याचे जाणवत आहे. म्हणूनच कबड्डीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कबड्डीपटू यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार परिषदे देण्यात आली.
ज्येष्ठ कबड्डीपटू रणजीतसिंह राणे, वसंत जाधव, जावेद शेख,प्रकाश बिद्रे आदींनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुने आणि नवीन खेळाडू उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.
या कबड्डीपटूंच्या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम कबड्डीपटू व क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. यावेळी ज्येष्ठ कबड्डीपटू रणजितसिंह राणे, वसंत जाधव, अनिल हळदीवे, विनायक पराडकर, प्रकाश बिद्रे, जावेद शेख, शरद शिरोडकर, अॅड. सुरेंद्र बांदेकर, अॅड. नंदन वेंगुर्लेकर, दिलीप म्हापसेकर, जयराम वायंगणकर, सुभाष भोगण, अजय जाधव आदी उपस्थित होते.
Home आपलं सिंधुदुर्ग कबड्डी खेळात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल स्थानावर होता परंपरा पुढे सुरू ठेवली पाहिजे...