आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी यांच्या वतीने श्रीमद भगवतगीता जयंतीनिमित्त हरेकृष्ण सत्संग कार्यक्रम

सावंतवाडी, दि. २२ डिसेंबर
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी यांच्या वतीने बुधवार 25 डिसेंबर 2024रोजी श्रीमद भगवतगीता जयंतीनिमित्त हरेकृष्ण सत्संग कार्यक्रम दोडामार्ग येथील कै हेमावती शंकर स्मृती हॉल महाराजा कॉम्प्लेक्स बाजारपेठ येथे सकाळी 11 ते 2 या वेळेत होणार आहे. या सत्संग कार्यक्रमात मानवी जीवनाच्या सध्याच्या त्रस्त परिस्थितीत भगवतगीतेतील तत्त्वज्ञानाचा उपदेशांचा आपल्या जीवनात आचरण करून मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट भागवत प्राप्ती कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन होणार आहे.
तसेच भजन कीर्तन प्रवचन आरती आणि महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या सत्संग कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ इस्कॉन सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.