वेळीच रुग्णवाहिका न मिळाल्याने दोडामार्ग रुग्णालयासाठी जागा दिलेल्या पुष्पलता सावंत यांचे निधन

दोडामार्ग,दि. २२ डिसेंबर

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे तंज्ञ डाॅक्टर नाही उपचार होत नाही ही समस्या नेहमीच भेडसावत आहे. प्रत्येक रुग्ण गोवा येथे पाठवला जातो. शिवाय या ठिकाणी काही राजकीय मंडळी तसेच लोकवर्गणीतून मिळून दोडामार्ग येथे पाच रुग्णवाहिका आहेत. पण एकही उपयोगी पडत नाही. काही रुग्णवाहिका पुढारी यांच्या ताब्यात आहेत. १०८ सहजा उपलब्ध होते पण ती बाहेर गेली तर मिळत नाही. रविवारी दोडामार्ग रुग्णालय येथे दोडामार्ग येथील पुष्पलता हरिश्चंद्र सावंत यांना रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर यामुळे त्यांना गोवा येथे दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका फोन केला तर १०८ सावंतवाडी येथे तर या ठिकाणी इतर रुग्णवाहिका देखील नाही. रुग्णालय येथे १०२ राष्ट्रीय चालक नाही. अखेर येथील एक युवक पुढे येऊन रुग्णवाहिका चालवत आझिलो जिल्हा रुग्णालय म्हापसा गोवा येथे दाखल केले. पण अर्धा तास विलंब झाला यामुळे दोडामार्ग रुग्णालय करीता पाच एकर जमीन दिलेल्या सावंत याना प्राण गमवावे लागले. रुग्णवाहिका असून त्या पुढारी मंडळी यांच्या सेवेला यामुळे संताप व्यक्त होत आहे.

दोडामार्ग येथे शासकीय १०८ आहे. दोडामार्ग रुग्णालय रुग्णवाहिका आहे. शिवाय शिवसेना वतीने, शिवाय लोकवर्गणीतून रुग्णवाहिका, विशाल परब कडून रुग्णवाहिका, इतर रुग्णवाहिका पाच सहा आहेत. पण शासकीय रुग्णवाहिका वगळता इतर रुग्णवाहिका कधी कुणाच्या उपयोगात येत नाही. अपघात झाला तरी १०८ बोलवावी लागते. पण इतर रुग्णवाहिका दोडामार्ग रुग्णालय येथे नाही तर पुढारी यांच्या घरी ठेवल्या आहेत शोभेच्या वस्तू म्हणून. लोकवर्गणीतून रुग्णवाहिका दिली तिचा उपयोग नाही. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते समीर रेडकर यांनी केला.
दोडामार्ग येथील भजनी कलाकार सुधीर सावंत यांच्या त्या मातोश्री होत्या दोडामार्ग रुग्णालय करीता जागा दिली. खुप काही केले पण पण त्या आजारी पडल्या तर त्यांना उपचारासाठी दाखल करायला रुग्णवाहिका नाही हे दूदैव म्हणावे लागेल. जर वेळप्रसंगी रुग्णवाहिका असून देखील पुढारी मंडळी आपल्या घरी ठेवत असतील तर त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी समीर रेडकर यांनी केली.