देवगड, दि. २२ डिसेंबर
कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांची राज्याच्या मत्स्य व बंदर विकास मंत्रीपदी निवड झाली. या निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ना.राणे आल्याने जनमानसात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पहील्यांदाच ना. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले.यावेळी पडेल कॅन्टीन येथे मंत्री नितेश राणे यांचा भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळस्कर यांनी मंत्री नितेश राणे यांचे चाफ्याच्या फुलांचा पुष्पहार घालून स्वागत केले.