देवगड, दि. २२ डिसेंबर
कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांची राज्याच्या मत्स्य व बंदर विकास मंत्रीपदी निवड झाली. या निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ना.राणे आल्याने जनमानसात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पहील्यांदाच ना. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले.यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायती भाजपा नगरसेवकांच्या वतीने शिवप्रतिमा देऊन मंत्री नितेश राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी गटनेते शरद ठुकरूल, माजी नगराध्यक्ष प्रणाली माने,उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नगरसेविका तन्वी चांदोस्कर,वी. सी खडपकर, योगेश पाटकर आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते