शिरगाव बाजारपेठ येथे मंत्री नितेश राणे यांचा भव्य सत्कार

देवगड,दि.२२ डिसेंबर

कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांची राज्याच्या मत्स्य व बंदर विकास मंत्रीपदी निवड झाली. या निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ना.राणे आल्याने जनमानसात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पहील्यांदाच ना. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले.यावेळी शिरगाव बाजारपेठ येथे मंत्री नितेश राणे यांचा भव्य हार घालून स्वागत करण्यात आले यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, चंद्रशेखर तावडे, युवराज माळवदे, गोटया राणे, ओंकार तावडे, ऋषीं माळवदे, राज साटम, बबली शिंदे, भूषण कदम, राज माळवदे, विशाल कुवळेकर, संतोष फाटक, मंगेश लोके, राजा साटम आदी भाजपा पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते