नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच शिवसैनिकांनी दहशत मोडून काढली – सुशांत नाईक

राणे बंधू ज्याअर्थी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करताहेत,म्हणजे दौरा यशस्वी ; तुम्हाला आगामी निवडणुकांमध्ये जनता जागा दाखवेल

कणकवली दि.६ फेब्रुवारी(भगवान लोके)

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यानंतर जिल्ह्यात भगवे वातावरण निर्माण झाले. या वातावरणाची दखल घेऊन निलेश राणे आणि नितेश राणे यांनी मुंबईतून जिल्ह्यात तातडीने येवून दौऱ्यावर टीका केली. त्यामुळे हा दौरा यशस्वी झाला हे निश्चित झाले आहे.नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच शिवसैनिकांनी दहशत तुमची मोडून काढली असल्याचा टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी उत्तम लोके,तेजस राणे उपस्थित होते.

उध्दव ठाकरेंचा जो सिंधुदुर्ग दौरा झाल्यामुळे दोन्ही भावांना इथे सिंधुदुर्गात येवून प्रेस घ्यावी लागते. याचाच अर्थ असा होता सिंधुदुर्ग दौरा उध्दव ठाकरे यांचा होता तो पुर्णपणे सफलतापुर्वक झालेला आहे. आणि जे काही वातावरण निर्मिती या सिंधुदुर्गामध्ये उध्दव ठाकरे च्या दौ-याने झाली. ती वातावरण निर्मिती ती काय तुम्ही बेताल वक्तव्ये करून तोडू शकत नाही. मुळात त्यांनी काही मुद्दे या मांडले. त्या मुद्दयावरती आम्हाला बोलायचंय.आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही काही आदेश दिलेले आहेत की , तुम्ही शांत राह खरं म्हणजे तुम्ही जे आदेश देताय २०१४ सालामध्ये ज्यावेळी नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच ही दहशत मोडून पडलेली होती. त्यामुळे तुमचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यामध्ये काहीही करायची हिंमत आतापर्यंत राहिलेली नाही. तुमचे कार्यकर्ते जे केसेस होतायत त्याला पुर्णपणे घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांची येण्याची हिंमत आता राहिलेली नसल्याचे खुले आव्हान सुशांत नाईक यांनी दिले आहे. त्यामुळे तुमचे आदेश द्या ..अगर नको द्या ते शांतच राहणार आहेत.

आरएसएस चे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. त्यामुळे मी मर्यादा सोडून काही बोलणार नाही .पण प्रेस चालु झाली आणि त्यानंतर शेवटी त्यांनी आपली मर्यादा सोडली. आणि त्या मर्यादा सोडल्यानंतर त्यांनी बरीचशी उदाहरणे दिली. भटक्या कुत्र्यांची उदाहरणे दिली . पण एक लक्षात घ्या की तुम्ही भटक्या कुत्र्यांची तुम्ही उदाहरणे दिली ती तुम्ही पाळीव कुत्र्यांची किंवा भटक्या कुत्र्यांची शेपुट बघितल असाल तर ती शेपुट जरी नळीत घातली किंवा ती सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी कधी सरळ होत नसते . त्याचप्रमाणे तुम्ही मर्यादा ओलांडली .त्याचप्रमाणे लक्षात आल की किती तुमचे संस्कार आहेत . त्यामुळे ही सभा तुम्हाला किती झोंबलेली आहे. हे त्यावरुन लक्षात येत आहे. भर सभेमध्ये तुम्हाला व तुमच्या भावाल शिव्या द्याव्या लागतात. ही तुमची शोकांतिका आहे . सरपंचांचे किती प्रवेश झाले बघा आमच्याकडे किती माणसे येतात बघा खरं म्हणजे तुम्ही कुठच्याही सरपंचांना विकत घेवू शकता या सभेने सिध्द केलेले आहे. तुम्ही कुठच्याही सरपंचांना विकत घेवू शकता पण कुठच्याही शिवसैनिकांना विकत घेवू शकत नाही. या विधानसभेमध्ये जी सभा नव्हती मात्र ४ तारीखला सभा घ्यायची ठरली,२४ तासांची सभा जवळजवळ ५ ते ६ हजार लोकांची झाली.

निर्भय बनो या सभेमध्ये सुध्दा ३ ते ३ हजार लोक जमा होवू शकतात. म्हणजेच नितेश राणेंनी समजुन घ्याव .आपला जनाधार व अंडरकरंट तुमच्या विरोधात आहे. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीला समजेल.कणकवली विधानसभेमध्ये कोणाच राज्य राहिलेलं आहे ? असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला.