हुर्शी येथील मानसी सुहास करंदीकर हिने एम ,एस्सी (,प्राणिशास्त्र )परीक्षेत मुंबई विद्यापीठ मध्ये प्रथम

देवगड, दि.२३ डिसेंबर
देवगड तालुक्यातील हुर्शी गावचे रहिवासी सुहास कृष्णाजी करंदीकर यांची कन्या कु.मानसी सुहास करंदीकर हिने एम ,एस्सी (,प्राणिशास्त्र )परीक्षेत मुंबई विद्यापीठ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले.चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालय प्राणिशास्त्र विभागाची ही विद्यार्थिनी असून या यशाबद्दल तिचे महाविद्यालय प्राचार्य,प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाबरोबर दीक्षित फाउंडेशनचे निरंजन दीक्षित यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.