तळेरे,दि.२३ डिसेंबर
22 डिसेंबर 2024
महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा श्री. प्रमोद हर्याण बुवा शिष्य मंडळाच्या वतीने जॉली उत्सव मंडळ, बी डी डी चाळ नं, लोअर परेल डिलाईल रोड यांच्या सहकार्यातून रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात सुमारे १०० रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजासमोर वेगळा आदर्श दिला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख दिपक बागवे यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी बोलताना श्री. भगवान लोकरे म्हणाले की, पूर्वीच्या काळी कन्यादान हे श्रेष्ठ मानले जात होते पण आताच्या काळात रक्तदान व अवयव दान हेच श्रेष्ठदान मानले जाते. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसंच आपलं रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. प्रमोद हर्यान व त्यांचा शिष्य परिवार भजनी कला जोपासताना नेहमीच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून समजासमोर आदर्श निर्माण करत असतात असे गौरवोद्गार त्याने काढले.
या शिबिरास माजी खासदार विनायक राऊत, आमदार सुनिल शिंदे, शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये, ज्ञानेश्वर मोरे,संपर्काध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मनसे, भजन सम्राट रामदास कासले, भगवान लोकरे, प्रमोद धुरी, भाई राणे, उदय पारकर, नाथा सावंत, नारायण ठाकुर, प्रदिप सावंत, लिंगायत बुवा, सुनिल लब्दे, नंदकिशोर कांदे, प्रकाश कुंदरकर, नाना शिरसाठ, सचिन कोर्लेकर, चंद्रकांत हर्याण, शाहू हर्याण सचिन हर्याण, सुभाष हर्याण श्री. लाड यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी हर्याण बुवा शिष्य परिवार सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी बुवा प्रमोद हर्यान यांनी उपस्थित रक्तदाते व मान्यवरांचे आभार मानले.