कडक पोलिस बंदोबस्तात मोजणी यशस्वी;ग्रामस्थांचे नियमबाह्य मोजणी असल्याचा आरोप
दोडामार्ग, दि. २३ डिसेंबर
सासोली गावातील ग्रामस्थ यांनी आपल्या हिश्शाची जमीन कंपनी यांना दिलेली नाही. शिवाय सामाहीक जमीन कुणाचा किती हिस्सा हे ठरलेले नाही
तरी या ठिकाणी कंपनीकडून वेळोवेळी पोट हिस्सा मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख अधिकारी प्रयत्न करत आहेत. या अगोदर अशा मोजणीला विरोध केला होता. शिवाय आंदोलन मोर्चा देखील काढले पण सासोली ग्रामस्थ यांची सामाहीक मोजणी मागणी पूर्ण झाली नाही. असे असताना सोमवारी सामाहीक जमीन मोजणी ऐवजी पोट हिस्सा सिद्ध झाला नाही. तरी भूमि अभिलेख अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामस्थ यांची हरखत लक्षात न घेता कडक पोलीस बंदोबस्तात सोमवारी कंपनीने पोट हिस्सा मोजणी सुरुवात केली. पण सासोली ग्रामस्थ यांनी ही मोजणी नियमबाह्य आहे. मान्य नाही असे हरकत पञ घेऊन काही तासांनी माघारी फिरले. कंपनीच्या वतीने महाजन यांनी यावेळी पोट हिस्सा मोजणीला विरोध करू नका ही झाल्यावर आपण सामाहीक जमीन मोजणी करू असे सांगितले . पण कुणी ऐकून घेतले नाही. शिवसेना नेते संदेश पारकर यांनी हा शेतकरी बांधव यांच्यावर अन्याय आहे. ही हुकुमशाही आहे. असा आरोप केला.
सासोली ग्रामस्थ यांनी जमीन मोजणी बाबत मोजणीला विरोध न करता जर सहकार्य केले तर यापुढे होणारी मोजणीला कंपनी सहकार्य करेल यामुळे प्रत्येकाला त्याची जमीन हिस्सा कुठे आहे याचा लाभ होणार आहे. केवळ विरोध करुन वाद निर्माण न करता सहकार्य करणे आवश्यक आहे. असे महाजन म्हणाले. अखेर पोलीस बंदोबस्त पोट हिस्सा मोजणी सुरळीत पार पडली.
यावेळी भूमी अभिलेख अधिकारी ठाकरे यांनी ही मोजणी कायद्याच्या चौकटीत राहून केली जात आहे. यात काही चूकीचे नाही असे यावेळी ग्रामस्थ राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या समोर स्पष्ट केले.