देवगड, दि. २३ डिसेंबर
अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा येथे शुक्रवार दि. २० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता तात्या भिडे सभागृहात संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री.सुनिल घस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.स्मिता तेली होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात सौ. तेली यांनी गाडगेबाबा यांच्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थी भाषणात कु. मयुरी तानवडे हिने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अभिराम नेने, प्रास्ताविक कु.आदित्य मराठे याने केले, तर आभार प्रदर्शन कु.दुर्वा पुजारे हिने केले. या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवीच्या वर्गाने केले होते.