केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा देवगडात निषेध…

नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांना देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने निवेदन

देवगड,दि.२३ डिसेंबर 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेविषयी अधिवेशन काळात राज्यसभेत आक्षेपार्यह विधान करून महामानवाचा अवमान केला आहे. भारतीय संविधानचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच दुसरीकडे संविधानाच्या शिल्पकारचा गृहमंत्र्याकडून उघडपणे अवमान होतो आहे ही घटना वेदनादायी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करीत आहोत. त्यांचा माफीनामा लिहून घेऊन त्यांचा केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, तळेबाजार व विजयदुर्ग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी देवगड तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद संपूर्ण देशात व राज्यात उमटत आहेत. देवगड येथे सोमवारी बौद्ध समाज बांधवांच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. देशाचे राष्ट्रपती दौपदी मुर्मू, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष यांना देवगड तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्रातील परभणी गंगाखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली. या आंदोलनात पोलीस कोठडीमध्ये अमानुष मारहाणीमुळे मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीची घटना ताजी असताना 17 डिसेंबर रोजी एका संविधानिक पदावर कार्यरत असलेले देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचेविषयी आक्षेपार्यह विधान करून महामानवाचा अवमान केला आहे. याविरोधात देशभरात व राज्यात संविधान प्रेमी व आंबेडकरी अनुयायामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्यावतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या आक्षेपार्यह विधानाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे असे म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी माफीनामा देऊन त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. देवगडचे निवासी नायब तहसीलदार विनायक ठाकूर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी देवगड तालुका सेवा संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर जाधव, सचिव राजेंद्र मुंबरकर, अनिल पुरळकर, किशोर कांबळे, उत्तम कांबळे, दिलीप वाडेकर, के. एस. कदम, विजय कदम. आनंद देवगडकर, श्रीपत टेंबवलकर, संतोष कदम, विलास जाधव, समीर शिरगांवकर, दीपक नाईक, रत्नदीप कांबळे, संतोष तळवडेकर, प्रवीण मोरे, अमोल मिठबावकर, भिकाजी कदम, प्रकाश जाधव, प्रशांत शिरगांवकर, अभिषेक कदम, प्रदीप पुरळकर, उत्तम कदम, सुमित जाधव आदी बहुसंख्य बौद्ध समाज बांधव उपस्थित होते. देवगड बस स्थानक येथून पायी चालत जात तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.