सासोली ग्रामस्थ यांनी आपल्या न्याय हक्कासाठी राजकीय लोकप्रतिनिधी वगळून प्रशासनाला सहकार्य करून

आपल्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे

दोडामार्ग, दि. २३ डिसेंबर

सासोली गावातील काही ग्रामस्थ यांनी आपल्या सामाहीक जमीन मधिल काही हिस्सा विक्री केला आहे. तर काही जणांनी विक्री केलेला नाही. काही जमीन कायदेशीर प्रक्रिया करून कंपनीने खरेदी केली आहे. याच्या सनदा तयार झाल्या आहेत. पण या जमिनीवरून गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. पण प्रत्येक वेळी राजकीय मंडळी सासोली ग्रामस्थ यांची बाजू मांडली पण यश आलेले नाही. प्रशासन आपल्या परीने पुढे जात आहे. पण ग्रामस्थ माञ न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. तेव्हा आता सासोली ग्रामस्थ यांनी राजकीय मंडळी याना बाजूला सारून प्रशासन व कंपनीला सहकार्य करुन आपल्या हिश्शाची जमीन पदरात पाडून घेण्यासाठी सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक आहे.
सासोली ग्रामस्थ यांची जवळपास बाराशे एकर सामाहीक जमीन आहे. यातील काही हिस्सेदार यांनी आपल्या हिश्शाची जवळपास शेकडो एकर जमीन ही विक्री केली आहे. कायदेशीर खरेदी खत सनदा पूर्ण झाल्या आहेत. पण सनदा खोट्या आहेत. असा आरोप करून काही राजकीय नेते मंडळी याना सोबत घेऊन आंदोलन मोर्चा काढला पण सासोली ग्रामस्थ यांची मागणी पूर्ण झाली नाही किंवा सनदा रद्द झाल्या नाहीत उलट काही ग्रामस्थ याना नाहक न्यायालय कोर्ट कचेरी करून वेळ वाया घालवत आहेत. ही बाब समोर येत आहे. काही राजकीय मंडळी सासोली ग्रामस्थ याना वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. पण सासोली ग्रामस्थ यांची मागणी आज देखील पूर्ण झालेली नाही. ही वस्तुस्थिती आहे.
सासोली गावातील जमीन मोजणी बाबत भूमी अभिलेख अधिकारी महसूल विभाग आपण कायदेशीर मार्गाने सर्व केले आहे. असा दावा करत आहे. शिवाय कंपनी देखील गावातील ग्रामस्थ याना त्यांचा हक्क द्यायला तयार आहे.
यासाठी कंपनीने खरेदी केलेली जमीन मोजणी बाबत ग्रामस्थ यांनी विरोध न करता सहकार्य भूमिका घेतली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. यामुळे प्रशासन आपल्या कायदेशीर मार्गाने पुढे जात आहे. हे असेच सुरू राहिले तर आता आंदोलन करणारी मंडळी तेथे राहाणार आहे.

सासोली ग्रामस्थ यांनी आता कंपनी व प्रशासन यंत्रणा यांच्या सोबत राहुन सामाहीक जमीन मोजणी व पोट हिस्सा मोजणी करून आपल्या हिश्शाची जमीन आपल्या ताब्यात घेण्यासाठी सहकार्य भूमिका घेण्यासाठी राजकीय मंडळी याना बाजूला सारून प्रशासन कंपनी सोबत राहुन विक्री न झालेल्या जमीनी हद्द निश्चित करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासकीय यंत्रणा आपल्या परीने कायदेशीर मार्गाने पुढे जाणार आहे. यात ग्रामस्थ याना न्याय मिळण
कठीण जाणार आहे. प्रशासन कंपनीला सहकार्य करुन आपली मागणी पदरात पाडून घेणे यासाठी सासोली ग्रामस्थ यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. यात हित आहे. त्यांचा हिस्सा त्यांना मिळणार आहे.