सावंतवाडी दि.२३ डिसेंबर
शहरात विविध ठिकाणांहून आलेल्या लोकांनी वस्ती केली असून त्यांचे नातेवाइकांचे निधन झाल्यावर स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी बांबू शोधून उपलब्ध होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी लोखंडी तिरडी उपलब्ध करून दिली आहे.
राजू मसूरकर म्हणाले,कुठलाही व्यक्ती सावंतवाडी शहरामध्ये निधन झाल्यानंतर स्मशानभूमी मध्ये नेताना बांबूची आवश्यकता भासते ,परंतु बऱ्याच ठिकाणी बांबू उपलब्ध न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि ते बांबू आणण्यासाठी कोलगाव येथून ते बांबू आणावे लागतात. यामुळे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नागरिकांना लोखंडी पोकळ बांबू सारखी पेंट करून तिरडी उपलब्ध करून सावंतवाडी नागरिकांना दिली आहे.
सावंतवाडी स्मशानभूमी मधून मारुती निरोडेकर यांच्याकडून तिरडी (शिडी) घेऊन जाता येईल .त्यांचा फोन नंबर 9405496502 असा आहे.