मालवण,दि.२३ डिसेंबर
भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा धामापूरच्या अध्यक्षपदी विजयकुमार विश्राम धामापूरकर तसेच सचिवपदी रवींद्र बाळकृष्ण कदम यांची निवड करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा धामापूरच्या नूतन कार्यकारणीची निवड तक्षशीला बुद्ध विहार धामापूर येथे मालवण तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा हिशेब तपासणी शिवप्रसाद चौकीकर, तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, प्रचार व पर्यटन सचिव संग्राम कासले, माजी सरपंच सप्तशिला धामापूरकर, तसेच धामापूर गावातील धम्म बांधव, भगिनी उपस्थित होते.
यावेळी निवडण्यात आलेली नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे- अध्यक्ष – विजयकुमार विश्राम धामापूरकर, उपाध्यक्ष – सुभाष बुधाजी धामापूरकर, सचिव – रवींद्र बाळकृष्ण कदम, कोषाध्यक्ष- मधुकर यशवंत नाईक, उपसचिव- विनोद राजकुमार भोईर, हिशेब तपासणीस – वैभव कृष्णा धामापूरकर, संघटक -हनुमंत गणपत नाईक, राजन जयवंत कदम, महादेव लक्ष्मण नाईक, सुरेश वासुदेव जाधव, संदीप आत्माराम धामापूरकर, गुरुदास दशरथ धामापूरकर.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, शिवप्रसाद चौकेकर, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी कार्यकारिणीने वर्षभरात राबवायच्या उपक्रमाबाबत माहिती दिली.