वरवडे फणसनगर येथील वृद्धाचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू

कणकवली दि.२३ डिसेंबर

: विषारी द्रव्य प्राशन केल्याने वरवडे,फणसनगर येथील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गजानन यशवंत परुळेकर(७१)असे त्यांचे नाव आहे.
गजानन परुळेकर हे रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे शेजारी जॉर्ज फर्नांडिस यांच्या घराच्या अंगणात आले.त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे फर्नांडिस यांनी त्यांना कारण विचारले असता आपण विषारी द्रव्य प्राशन केल्याचे त्यांनी सांगितले. फर्नांडिस यांनी तत्काळ पोलिस पाटील सिध्देश मेस्त्री यांना घटनेची माहिती दिली.त्यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून परुळेकर यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.तेथून ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात त्याना नेण्यात आले.मात्र,रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.ही घटना घडली तेव्हा परुळेकर यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.