कणकवली,दि.२३ डिसेंबर
कणकवली रेल्वे स्टेशन ब्रिज ते मुर्डेश्वर मैदान पर्यत १ किलोमीटर रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात झाली आहे. हे काम दर्जेदार व्हावे यासाठी स्वतः कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी या रस्त्याची पाहणी केली.यावेळी ठेकेदाराला दर्जेदार व व्यवस्थीत काम करावे अशा सूचना श्री. सर्वगोड यांनी दिल्या आहेत.कणकवली कनेडी १२ किलोमीटर रस्त्याचे काम आता पूर्णत्वास येत आहे. यापूर्वी
हा रस्ता ५.५ मीटर चा होता आणि आता १० मीटर रुंद हा रस्ता होत असल्याने प्रवासी देखील समाधान व्यक्त करत आहेत.