कणकवली दि.२३ डिसेंबर
फोंडाघाट, कोरगावकरवाडी येथील संदेश शांताराम देसाई(३६)या तरुणाने घराच्या बाहेरील शेड मध्ये नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
मात्र,संदेश याने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
संदेश हा पाच वर्षांपूर्वी पुणे येथे होता.तेथून तो आपल्या घरी फोंडाघाट येथे परतल्यावर वेल्डिंगचा व्यवसाय करत होता. सोमवारी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेरील शेड मध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत तो काहीजणांना दिसून आला. त्याला खाली उतरवून पाहिले असता तो मृत झाल्याचे लक्षात आले. संदेश हा अविवाहित होता.त्याचा भाऊ दत्तकुमार शांताराम देसाई याने पोलिस ठाण्यात या घटनेबाबत माहिती दिली आहे.अधिक तपास फोंडाघाट पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.