त्या समाजकंटकांविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल

सामाजिक एकता मंचाच्यावतीने कणकवली प्रांताधिका-यांना निवेदन

कणकवली,दि.२३ डिसेंबर

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही समाजकंटकांविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा . गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे बेताल , अविवेकी विचार मांडले त्यांचा निषेध करत असल्याचे निवदेन सामाजिक एकता मंचाच्यावतीने कणकवली प्रांताधिका-यांना देण्यात आले.

यावेळी सामाजिक एकता मंच सिंधुदुर्गचे संदीप कदम, संजय कदम, सी. आर. चव्हाण, अंकुश कदम, विठ्ठल जाधव, राजेंद्र कदम, दीपक कदम ,भिमराव कदम ,संजय कदम, संजय कदम, सिद्धार्थ कदम, विश्वनाथ कदम, सागर पोमेडकर ,सुहास कदम, प्रभाकर चव्हाण ,सुनील तांबे ,संतोष पाटणकर, मधुर पाटणकर, ललित पाटणकर ,संदेश पाटणकर, सुनील तांबे, संदेश कदम, संदीप तांबे, संदीप पाटणकर, संदीप कदम, सुनील शेवडे , प्रदीप कदम , संजय कदम , भूषण गोवनकर, राजन यादव, विश्वनाथ कदम ,सुनील कदम ,राहुल कदम ,अशोक कदम ,विनायक मिस्त्री, प्रवीण वरुणकर आदी उपस्थित होते.

कायद्याचा अभ्यासक असणारा परभणी येथील आंबेडकरवादी वडार समाजाचा कायद्याचा अभ्यासक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यु झाला आहे. सदरील मृत्युची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे . परभणी मधील बौध्द वस्त्यांमध्ये कौंबिंग ऑपरेशन राबवून सुशिक्षित बौध्द तरूणांना लक्ष करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ‘भारतीय राज्यघटनेची प्रतीकृती’ ची विटंबना करून तोडफोड करणाऱ्या इसमाविरूध्द आणि अशा घटना करायला लावणाऱ्या व षडयंत्र करणाऱ्या यंत्रणेचा सुत्रधार शोधणासाठी ‘केंद्रिय अन्वेषण विभाग’ यांच्यातर्फे तपास करून योग्य कारवाई करण्यात यावी , ज्या संघटना, संस्था व व्यक्ती संविधानाला मानत नाहीत, भारतीय राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात, भारतीय राज्यघटनेचा मुळ ढाचा बदलून धार्मिक ढाचा बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा सर्व संघटना, संस्था व व्यक्ती यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याबाबत , संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीची सन्मानाने उभारणी करावी तसेच संरक्षणाची जबाबदारी परभणी प्रशासनाने घ्यावी , या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी , तसेच सदर घटनेबाबत एस.आय.टी. ची स्थापना महाराष्ट्र सरकारने करून संबंधितांवर कारवाई करावी , सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री फंडातून ५० लाखाची मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.