रेखाकला परिक्षेत देसाई स्कूलचे यश

वेंगुर्ला,दि.६ फेब्रुवारी

महाराष्ट्र शासन कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकिय रेखाकला मध्ये प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

शाळेतील निधी पालकर, केतकी चेंदवणकर, चिन्मय पेडणेकर या विद्यार्थ्यांनी ‘अ‘ श्रेणी प्राप्त केली. इतर विद्यार्थ्यांनी ‘ब‘ व ‘क‘ श्रेणी प्राप्त करत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक पांडुरंग मिशाळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्राॅन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी देसाई-मोरे, मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.