आचऱ्या नजीक विनापरवाना कर्नाटक मलपी मासेमारी नौकेवर कारवाई

मत्स्यपरवाना अधिकारी पार्थ तावडे यांची कारवाई; मच्छीमारांमधून समाधान व्यक्त

देवगड,दि.२४ डिसेंबर

देवगड महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात १५ वावात देवगड समोर आचऱ्या नजीक विनापरवाना कर्नाटक मलपी येथील खुषी या मासेमारी नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्यव्यसाय विभाग पोलीस प्रशासन सयुक्तिक कारवाई करुन मासेमारी करताना कर्नाटक मलपी येथील मासेमारी नौकेवर कारवाई केली आहे कर्नाटक मलपी येथील मासेमारी नौका किनारपट्टी नजीक मासेमारी करीत असल्याची माहिती मिळताच सागरी गस्ती नौकेच्या सहाय्याने पाठलाग करून पकडली.ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्यव्यसाय आयुक्त अतुल पाटणे, सह आयुक्त महेश देवरे आणि प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी येथील रामभद्र हायस्पीड नौका आणि सिंधुदुर्ग येथील गस्ती नौका संयुक्तिक गस्त घालीत असताना
मत्स्यपरवाना अधिकारी पार्थ तावडे यांनी केली.

नुकत्याच झालेल्या नागपूर येथील अधिवेधनात आम.निलेश राणे यांनी परप्रांतीय मलपी नौकांचे अतिक्रमण व वाढती घुसखोरी संदर्भात आवाज उठविला होता.त्याचबरोबर नुकताच पदभार घेतलेले मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नाम.नितेश राणे यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यात देवगड येथे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी यांचेशी सुसंवाद साधला व या परप्रांतीय नौका अतिक्रमण व किनारपट्टी वरील आक्रमण बाबत कडक ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागाने कडक धोरण अवलंबित ही तिसरी कारवाई देवगड बंदरात केली असून या कारवाईत विविध प्रकारची मासळी जप्त करून तिचा लिलाव केला आहे.त्या लिलावाच्या पाच पट दंडाची रक्कम नौका मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात ज्या प्रकारची अद्ययावत गस्ती नौका उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्या पद्धतीची आद्ययावत मोठी गस्ती नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः देवगड किनारपट्टी वर तैनात करणे गरजेचे आहे.जेणेकरून अतिक्रमण करणाऱ्या अधिकाधिक नौकांवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया स्थानिक मच्छिमार प्रतिनिधी ज्ञानेश्वर खवळे यांनी व्यक्त केली.व मत्स्यव्यवसाय विभागाच्या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले