कणकवली दि.२४ डिसेंबर
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे.तत्पूर्वी त्यांनी प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
त्यानंतर मंत्रालयात तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तसेच मंत्रालयातील दालन क्रमांक २, मंत्रालय मुख्य इमारत या दालनात जाऊन पदभार स्वीकारला.
यावेळी मत्स्य व बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला.