कुडाळ-बाव रस्त्यांच्या दूरवस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक

शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत केले पायऱ्यांवर आंदोलन

सिंधुदुर्ग,दि.२४ डिसेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची वाताहत झाली आहे.
कुडाळ तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाची झालेल्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला जाग येत नसल्याने आज उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे आणि बाव, बांबुळी, कविलकट्टा येथील नागरिकांनी बांधकाम विभागावर धडक देत आंदोलन छेडले.

कुडाळ ते बाव या ग्रामीण मार्गाची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पडले आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाच्या दूरवस्थेमुळे दोघा नागरिकांनाही आपले प्राणही गमवावे लागलेत. या मार्गाच्या दुरवस्थेबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. मात्र, या निवेदनांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.