मालवण,दि.२४ डिसेंबर
‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेसाठी प्रसिद्ध असलेल्या कोईल येथील श्री गणपती मंदिराच्या कलशारोहणाचा तिसरा वर्धापनदिन सोहळा दि. २८ व २९ डिसेंबर रोजी होणार आहे. यनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि. २८ रोजी सकाळी ८ वा. श्रींची नित्यपूजा, ९ ते १२ वा. धार्मिक विधी होम हवन, दुपारी १२ ते १ वा. नामस्मरण आरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ८ वा. वारकरी दिंडी भजन, रात्री ९ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, २९ रोजी सकाळी ८ वा. श्रींची नित्यपूजा, ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ११ ते १ वा. सुस्वर भजन, आरती बुवा वैभव शेट्ये बुवा अमित सावंत ( मुणगे ), १ ते ३ वा. महाप्रसाद, ३ वा. सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी स्पर्धा, सायंकाळी ६ ते ७ वा. दीपोत्सव, सायं. ७ ते ८. ३० वा. सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत धोंड ( कुडाळ ) यांचे कीर्तन, ९ वा. मान्यवरांचे सत्कार व बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.